बार्शी – आजपासून भगवंत मंदिर बार्शी येथे हभप राघव चैतन्य बाबा पुणे यांची श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सुरुवात झाली. या प्रसंगी बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते मा. आमदार राजाभाऊ राऊत व त्यांच्या पत्नी सौ. कविताताई राऊत, बार्शीच्या नगराध्यक्ष तेजस्विनीताई कथले व प्रशांत कथले, बार्शी पंचायत समितीच्या सभापती सौ. मीनाक्षीताई रोंगे, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विजय गरड सर तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी नगरपालिकेचे नगरसेवक विजय चव्हाण, प्रकाश माने, नगरसेविका सौ. चंद्रकला कांबळे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली आहे. तरी आजपासून सहा जूनपर्यंत कथा भगवंत मंदिरात होत आहे तरी सर्वांनी या कथेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक व बाबासाहेब कापसे यांनी केले आहे.