टेंभुर्णी – माढा येथील होमगार्ड मध्ये पाच वर्षांपासून कार्यरत असलेले जय रामेश्वर सदाफुले याची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सोलापूर ग्रामीण मध्ये नुकत्याच झालेल्या भरतीमधून पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झालेबद्दल त्याचा फेटा बांधून शॉल,श्रीफळ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप, शिवसेना तालुका उपप्रमुख सुरेश लोंढे,महामानव प्रतिष्ठानचे यशपाल लोंढे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सोपान ढगे, पत्रकार संतोष वाघमारे, आशिष लोंढे,सुमीत गायकवाड आदिजण उपस्थित होते.
















