सांगोला – सांगोल्यातील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिवाळीत घराची सजावट करण्यासाठी कागदी आकाशकंदील बनवण्याची सोपी कृती कराड येथील प्रशिक्षक ऋषिकेश पोटे व नेहा पोटे यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. दरम्यान प्रशिक्षकाचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. आभार शिक्षिका गोडसे यांनी मानले.