Monday, May 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पालिकेचे उत्पन्न वाढीवरून सत्ताधारी विरोधी गटात वादावादी…कॉरिडोर स्थगितीवरुन सभेत ‘खडाजंगी’

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
पालिकेचे उत्पन्न वाढीवरून सत्ताधारी विरोधी गटात वादावादी…कॉरिडोर स्थगितीवरुन सभेत ‘खडाजंगी’
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने पंढरपुरात कॉरिडोर करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉरिडोरच्या विषयावरून नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली.

पंढरपूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष डॉ.प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेसमोरील विषयपत्रिकेवर बारा विषय होते. दरम्यान दिवसेंदिवस पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. यामुळे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने कॉरिडोर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरिडोरला मंदिर परिसरातील नागरिकांकडून विरोध  होत आहे. यामुळे हा विषय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभे  समोर आला असता कॉरिडोर वरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली. त्यामुळे कॉरिडोर विषयाचा प्रस्ताव स्थगित करण्याचा ठराव सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांकडून सर्वानुमते करण्यात आला.

या विषयाच्या चर्चेत सत्ताधारी गटाकडून वासुदेव उर्फ भागवत बडवे, सुनील वाळुजकर, सौरभ थिटे पाटील, लक्ष्मण पापरकर तर विरोधी गटाचे नगरसेवक राहुल शिंदे तसेच अपक्ष नगरसेवक ओंकार जोशी आणि पालिकेच्या नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके यांनी देखील सहभाग नोंदविला.
———————-


एकदा काय दाखवायचे ते दाखवा : नगरसेविका शिरसट आक्रमक
पंढरपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेमध्ये एका विषयावरून नगरसेविका उज्वला भालेराव यांनी उत्पन्न वाढीसाठी झोपडपट्टी धारकांकडून खणपट्टी वसूल करावी, पाणीपट्टी वसूल करावी अशी मागणी केली. त्यावेळेस ज्येष्ठ नगरसेवक नागेश भोसले यांनी हस्तक्षेप केला. यावेळी नगरसेवक लक्ष्मण शिरसाट हे उठले नगरसेविकांना बोलू द्या, विषय टाळू नका, असे सांगताच नगरसेवक लक्ष्मण शिरसाट व इतर नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली. यामुळे सभागृहात असलेल्या लक्ष्मण शिरसाट यांच्या सुनबाई प्रणिता शिरसट या आपल्या सासऱ्यांच्या मदतीला धावून गेल्या यावेळी त्यांनी सभागृहातील विरोधी नगरसेवकांना उद्देशुन एकदा काय दाखवायचे ते दाखवा, आम्ही पण पाहायला तयार आहोत  असे खडे बोल सुनावले.
———————-
चौकट : ( ठेकेदाराची ४७ कोटी रुपयांची देणी )
पंढरपूर नगर परिषदेची चेतपत्रिका काढावी अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार ही श्वेतपत्रिका काढण्यात आली असून यामध्ये ४१ कोटी रुपये ठेकेदारांचे तसेच ६ कोटी रुपये पाणी पुरवठ्यासाठी असे एकुण ४७ कोटी रुपयांची देणी असल्याचे दिसून आले आहे.
——————-

झोपडपट्टीधारकांना न्याय मिळावा : नगरसेवक राहुल शिंदे
शहरातील झोपडपट्यांमधून अनेक नागरिक तीन, तीन पिढ्यापासून वास्तव्य करीत आहेत. मात्र या झोपडपट्यांच्या जागांवर नगर पालिकेकडून विविध प्रकारची आरक्षणे टाकण्यात आलेली आहेत. त्यामुळे या झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी २५ तारखेला एक परित्रक काढुन ५०० स्के.फुटाच्या जागांवरील अनाधिकृत बांधकाम असलेली घरे नियमित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच धर्तीवर येथील झोपडपट्टी मधील जागांवरील पालिकेची आरक्षणे काढून जी मंडळी पिढ्यानपिढ्या तेथे वास्तव्य करीत आहेत त्यांच्या नावावर त्या जागांचा सातबारा उतारा मिळावा अशी महत्वपुर्ण सूचना करुन मुख्यमंत्र्यांचे देखील यावेळी नगरसेवक राहुल शिंदे यांनी आभार मानले.

Post Views: 19
Previous Post

उन्हाच्या कडाक्यात दिलासा; शेतकरी आणि वाटसरूंसाठी बार्शीत थंड पाण्याची सोय

Next Post

भीम प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; दैनिक तरुण भारतचे उपसंपादक किरण बनसोडे यांचा होणार सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
भीम प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; दैनिक तरुण भारतचे उपसंपादक किरण बनसोडे यांचा होणार सन्मान

भीम प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; दैनिक तरुण भारतचे उपसंपादक किरण बनसोडे यांचा होणार सन्मान

ताज्या बातम्या

पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना ‘मानधनाची पहिली भेट #marathinews

May 17, 2026

विणकर बागेत नवीन ओपन जिम चे लोकार्पण

May 17, 2026

कांतारा नव्हे वळसंगचे बाळबट्टल #viral #solapurnews

May 17, 2026

जागर यात्रेने सर्व युवकांना जोडणार कृष्णराज महाडिक

May 17, 2026

नसरापूरच्या चिमुकलीसाठी पुढाकार घेणार महाडिक

May 17, 2026

पाण्यावरून शिवसेनेच्या अमोल बापू शिंदेनी केली भाजपवर कडक टिका

May 17, 2026

आम्हाला किंमत का देत नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात घातली फरशी #marathinews #solapurnews

May 17, 2026

५० लाखांसाठी विवाहितेचा छळ #solapurnews #viral

May 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0868820

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697