अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मागॅदशॅनाखाली व न्यासाचे प्रमुख कायॅकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच संस्थेकडून विधायक कायाॅला मदत असते, याचाच एक भाग न्यासाच्या सहयोगाने आणि माणुसकी फाउंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाची सुरुवात श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या श्री तारामाता प्राथमिक शाळा, येथून करण्यात आले.
दरम्यान अमोलराजे जनमेजयराजे भोसले, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी १०,००० वह्यांच्या वाटप उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे.
यावेळी अरविंद शिंदे , मनोज निकम , प्रवीण देशमुख, प्रवीण घाटगे, सुमित घाटगे तसेच माणुसकी फाउंडेशनचे आकाश शिंदे, अनंत क्षीरसागर, समर्थ क्षीरसागर, आशिष हुंबे, बाबुशा भालके तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.