जेऊर – चिखलठाण (ता करमाळा) येथे वडिलांच्या पुण्यस्मरणानिमीत्त इतर खर्चाला फाटा देत गावातील शालेय विध्यार्थ्यांना पंचवीस हजार रूपयांचे शालेय साहित्याचे वाटप करण्याचा येथील चव्हाण परिवाराचा आगळा वेगळा उपक्रम इतरांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे.
येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा चिखलठाण या विद्यालयात संभाजी शिवदास चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त संतोष संभाजी चव्हाण यांनी सुमारे 25 हजार रुपये किमतीच्या वह्या ,पेन आणी शालेय साहित्याचे वाटप शाळेतील विध्यार्थ्यांना करण्यात आले
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा स्कुल कमिटी सदस्य राजेंद्रकुमार बारकुंड श्रेया संतोष चव्हाण यशराज संतोष चव्हाण विद्यालयातील शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल बोलताना राजेंद्रकुमार बारकुंड यांनी आज समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी अनेक अनावश्यक गोष्टीवर खर्च केला जातो. तो खर्च जर शिक्षणासाठी झाला तर त्याचा अनेक गरजूंना फायदा होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन चव्हाण परिवाराचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक लक्ष्मण गोडगे यांनी केले तर आभार विश्वनाथ सुरवसे यांनी मानले.
Post Views: 15