Tuesday, August 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“बालसुरक्षेसाठी दुहेरी आरोग्य कवच’; अतिसारमुक्त बालपणसह पोलिओमुक्त भविष्याकडे सोलापूरची वाटचाल 

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दुहेरी मोहिमेचा प्रारंभ केला आहे. ‘अतिसार थांबवा’ अभियानाद्वारे बालमृत्यू रोखण्याचा निर्धार करण्यात आला असून, त्याचबरोबर २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवून पाच वर्षांखालील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
                 जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर ‘अतिसार थांबवा’ मोहीम ३१ जुलै २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. बालकांमध्ये अतिसारामुळे होणारे मृत्यू पूर्णपणे रोखणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यात वाढणाऱ्या अतिसाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सर्वेक्षण करणार आहेत.
                   जिल्ह्यातील ३ उपजिल्हा रुग्णालये, १४ ग्रामीण रुग्णालये, ८२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्य केंद्रे आणि ४३३ उपकेंद्रांमधून ओआरएस व झिंक गोळ्यांचे मोफत वितरण केले जाणार आहे. तसेच प्रत्येक आरोग्य संस्थेत ‘झिंक-ओआरएस कॉर्नर’ सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ३६ हजार ५७२ बालकांना या मोहिमेचा लाभ मिळणार असून, सर्वेक्षणा दरम्यान अतिसाराची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार आणि औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
          दरम्यान, रविवारी २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यासाठीही आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ३६ हजार ५७२ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यासाठी ग्रामीण भागात ५ हजार ५७०, शहरी भागात ५७० आणि महानगरपालिका क्षेत्रात ३७३ लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत.
           या मोहिमेसाठी ७ हजार २२२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांच्यामार्फत देखरेख केली जाणार आहे. बसस्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, विटभट्ट्या, साखर कारखाने, यात्रा आणि लग्न समारंभ स्थळांवर विशेष लसीकरण सुविधा उपलब्ध राहणार आहेत. तसेच भटक्या वसाहती व ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल पथके कार्यरत राहतील. बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पालक यांचा समन्वयच या दोन्ही मोहिमांच्या यशाचा खरा आधार ठरणार आहे.
कोट
सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजावेत
‘एकही बालक वंचित राहू नये’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आरोग्य विभागाने पालकांना आवाहन केले आहे. पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजावेत, तसेच अतिसाराची लक्षणे दिसताच आशा सेविका किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी केले आहे.
चौकट
ठळक आकडेवारी
🔹
 ‘अतिसार थांबवा’ मोहीम कालावधी : ३१ जुलै २०२६ पर्यंत
🔹 ० ते ५ वर्षे वयोगटातील बालके : ४,३६,५७२
🔹 उपजिल्हा रुग्णालये : ३
🔹 ग्रामीण रुग्णालये : १४
🔹 प्राथमिक आरोग्य केंद्रे : ८२
🔹 आरोग्य उपकेंद्रे : ४३३
🔹 झिंक-ओआरएस कॉर्नर : सर्व आरोग्य संस्थांमध्ये
🔹 राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम : २८ जून २०२६
🔹 ग्रामीण भागातील पोलिओ बूथ : ५,५७०
🔹 शहरी भागातील पोलिओ बूथ : ५७०
🔹 महानगरपालिका क्षेत्रातील पोलिओ बूथ : ३७३
🔹 एकूण लसीकरण कर्मचारी : ७,२२२
🔹 विशेष मोबाईल पथके : भटके, स्थलांतरित व ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांसाठी
Post Views: 243
Previous Post

पोलिओचा धोका शून्यावर’ ठेवण्यासाठी जिल्हा सज्ज

Next Post

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

ताज्या बातम्या

मिनी राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी कुचन प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांची निवड

August 18, 2026

बार्शीत अल्पवयीन मुलीची छेड; एकावर गुन्हा

August 18, 2026

सांगोला महाविद्यालयात बीसीए भाग-१ प्रवेशाची संधी

August 18, 2026
गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

August 18, 2026
माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

August 18, 2026
शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 18, 2026

बार्शीत घराचे कुलूप तोडून वेल्डिंग साहित्याची चोरी

August 18, 2026

बार्शीत शहरात दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल 

August 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1086347

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!