सोलापूर – हिटर लावलेल्या बादलीतील गरम पाणी अंगावर पडल्याने एक आठ वर्षाची बालिका सर्वांग भाजून जखमी झाल्याची घटना कुमठा नाका भागातील भारत नगरात आज गुरुवारी सकाळी आठ वाजता घडली .
गायत्री संतोष राठोड ( वय 8 वर्ष ,रा. भारत नगर सोलापूर ) असे त्या जखमी बालिकेचे नाव असून आज गुरुवारी सकाळी घरामध्ये किचन कट्ट्यावर पाणी गरम करण्यासाठी बादलीत हीटर लावले होते .त्यावेळी ही बालिका त्या ठिकाणी जाऊन बादली ओढली असता त्यातील गरम पाणी तिच्या अंगावर पडून ती सर्वांग भाजून जखमी झाली . तिला उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात मदतनीस धमाजी जाधव यांनी सकाळी दाखल केले .
Post Views: 4