सोलापूर – मोटर सायकल घेऊन जाऊ नको म्हटल्याने एका मुलाने आपल्या बापाला काठीने व हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना डोणगाव रोडवरील अक्षत फार्म येथे आज गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली .
दिलीप सोमनाथ सोनवणे (वय 49 वर्ष , रा. अक्षत फार्म , डोनगाव रोड सोलापूर ) असे त्या जखमी बापाचे नाव असून आज गुरुवारी सकाळी घरामध्ये वडिलांनी मुलाला दुचाकी घेऊन जाऊ नको असे म्हटले तेव्हा राग आल्याने मुलगा गौरव याने वडिलांना काठी व हाताने मारहाण केली . यात डोळ्यावर जखम व सर्व अंगाला मुका मार लागल्याने ते उपचाराकरता येथील शासकीय रुग्णालयात स्वतः सकाळी दाखल झाले .
Post Views: 4