पंढरपूर – नवरात्र महोत्सवा निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे आठव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस पसरती बैठक पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याचे मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठया जोड, शिरपंच मोठा, शिरपेत लहान, मोत्याचा तुरा, तुळशीची माळ एक पदरी, लॉकेट पाच पदरी, लहान चंद्रहार, लॉकेट नऊ पदरी, लॉकेट पट्टीचे, अष्टपैलू मण्याची कंठी, मोहनमाळ, अष्टपैलू कंठी पदकासह, लॉकेट बदामासह, तोडे जोड, लॉकेट चार पदरी, मत्स्य जोड, सोने पितांबर इ. अलंकार परिधान करण्यात आलेली आहेत.
या बरोबरच रुक्मिणी मातेस सोन्याचे मुकुट, खड्यांची वेणी, सोन्या मोत्याची ताणवाड, चिंचपेटी हिरवी, मोत्याचा कंठा, मन्या मोत्याच्या पाटल्या जोड, मोत्यांचे मंगळसूत्र, मोत्याचे बाजूबंद, पैंजण जोड, कर्णफुले, मोरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, कंबरपट्टा, जवमणी पदक, तारामंडळ, हिऱ्यांची नथ इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
————
चौकट – (राधिका,सत्यभामा आणि महालक्ष्मीस देखील अलंकार)
राधिका मातेस नक्षी टोप, चिंचपेटी तांबडी, जवेची माळ, पुतळ्यांची माळ, लक्ष्मी हार. सत्यभामा देवीला नक्षी टोप, पुतळ्यांची माळ, जवेची माळ, पुतळ्यांची माळ, तुळशी माळ इत्यादी अलंकार. महालक्ष्मी मातेला सोन्याचे गंठण, इमिटेशन नेकलेस, लफ्फा, शिरपेच मोठी, बोरमाळ, मोहरांची माळ, जवेची माळ,. तांदळा हार, मोठी एकदानी, चांदीची छत्री इत्याधी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
——————-
चौकट: (श्री व्यंकटेशास राम अवतार)
श्री व्यंकटेशास राम अवतार पोशाखासह मोहनमाळ, नामनिळाचा, राखी, कोयरीहार, हिऱ्याचे कंगन, मोत्याची कंठी, मोत्याची कंठी दोन पदरी, दंडपेट्या जोड, नक्षी टोप, प्रभावळीसह, मारवाडी पेठयांच्या मोतीहार, तुळशीमाळ, बाजीराव कंठी, बासरी, चांदीची छत्री इत्यादी अलंकार प्रथा परंपरेप्रमाणे परिधान करण्यात आलेले आहेत.
—————-
चौकट : मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आलेले आहेत.
—————
तसेच दि. २० ऑक्टोंबर रोजी रिध्दी – सिध्दी गणपती मंदिरात विजया दशमी दसरा निम्मित दरवर्षी प्रमाणे सिमोल्लंघन साजरे करण्यात येत आहे, तसेच त्या ठिकाणी देखील आवश्यक त्या सोई सुविधा पुरविण्यात येत आहेत.
———- ———–
चौकट: दि.२२ ऑक्टोंबर रोजी एकादशी असल्याने भाविकांची मोठी प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने दर्शनरांगेत सुरक्षा रक्षक नियुक्ती, पाणी व चहा वाटप, बॅरीकेटींगची व्यवस्था विद्युत व्यवस्था इतर अनुषंगीक सोई सुविधा पुरेसा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
Post Views: 10