सोलापूर – कुत्रे मागे लागल्याने दुचाकी वर मागे बसलेल्या महिलेचा खाली पडून मृत्यू झाला.
शिलाबाई मनोहर मुळे ( वय 65 वर्ष , राहणार तुगाव , उमरगा ,जी धाराशिव ) असे त्या मयत महिलेचे नाव आहे .त्या शनिवारी दुपारी येणेगुर येथून दुचाकी वर मागे बसून घराकडे निघाल्या असताना वाटेत तूगाव पाटी जवळ काही कुत्रे त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागे लागले . त्यामुळे त्या घाबरून खाली पडल्या . यात डोक्याला , कानाला ,नाकाला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या . त्यांना उमरगा एका खाजगी दवाखान्यात उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात मुलगा ब्रह्मानंद याने सायंकाळी बेशुद्ध अवस्थेत दाखल केले असता त्यांचा तासभरातच मृत्यू झाला .
Post Views: 22