पंढरपूर – वारकरी सांप्रदाया मध्ये कुंभमेळ्या इतकेआषाढी एकादशीच्या सोहळ्याला महत्व असते. देहू, आळंदीसह राज्याच्या विविध भागातून संतांचे पालखी सोहळे पंढरपूरात येत असतात. यंदाच्या वर्षी चक्क लंडन येथून विठ्ठल भक्ताची दिंडी पंढरपूर येथे येणार आहे.यामुळे विठ्ठलाची भक्ती साता समुद्रापार पोहोचली असल्याचे दिसून येत आहे.
आषाढीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहू येथून संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ७ जुलै तरआळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी मार्गस्थ होणारआहे. संतांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असूनहरिनामाचा गजर करत हा पालखी सोहळा पंढरपुरात दाखल होणार तसेच विविधगावातून संतांचे पालखी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत.
याच धर्तीवर यावर्षी लंडन ते पंढरपूर ही पहिली ग्लोबल दिंडी आषाढी यात्रेसाठी येणार आहे. ही दिडी ११ देश व ५० दिवसाचा प्रवास करून शेकडो भक्तांसह आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात पोहोचणार आहे. लंडन येथून ही दिंडी ६ जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. ११ देश व ५० दिवसाचा प्रवास करून हा दिंडी सोहळा २६ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे. ही दिंडी लंडन, नेदरलँड, बेरियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, झेक, रिपब्लिकनहंगेरी, तुर्की, जॉर्जिया आदीदेशातून भारतात येणार असून पंढरपुरात दाखल होणार आहे. या दिंडीचे आयोजन अनिल खेडकर या मराठीभक्ताने केले आहे. विठ्ठलाचे असंख्य भक्त भारतात आहेत. तसेच हे भक्त आता सातासमुद्रापार उपजिविकेसाठी वास्तव्यास
असले तरी त्यांचे विठ्ठलावरील प्रेम आणि भक्ती तूसभर देखील कमी झाली नसल्याचे दिसतआहे. एकंदरीतच राज्यासह देशातील इतर राज्यातून येणाऱ्या विविध संतांच्या पालखी सोहळ्या बरोबरच आता थेट लंडन येथून देखील पालखी सोहळा पंढरपूरात येणार असल्यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेसाठी हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Post Views: 44