सोलापूर : श्री सोन्या मारुती युवक मंडळाच्या वतीने आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक लेझीम सरावाला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. मंडळातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत लेझीमच्या विविध तालांचा व डावपेचांचा सराव सुरू केला आहे.
पारंपरिक कला व संस्कृतीचे जतन करण्यासोबतच युवकांमध्ये शिस्त, एकजूट आणि उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशाने हा सराव घेण्यात येत आहे. लेझीमच्या तालावर युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंडळाच्या वतीने यंदाही पारंपरिक पद्धतीने लेझीमचे सादरीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी सरावाला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे श्री. विनायक महिंद्रकर यांनी दिली.





















