सोलापूर – भारताच्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘दुलीप ट्रॉफी’च्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी सोलापूरचे अनीश सहस्रबुद्धे यांची पंच म्हणून निवड झाली आहे. सोलापूर क्रिकेट वर्तुळासाठी हा अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे.
आज, ३० ऑगस्टपासून सुरू झालेला हा चार दिवसीय सामना ‘सेंट्रल झोन’ विरुद्ध ‘ईस्ट झोन’ यांच्यात खेळवला जात असून, या संपूर्ण सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स’ वाहिनीवर होत आहे. अनीश सहस्रबुद्धे यांच्या या यशामुळे सोलापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या मानात मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी त्यानी रणजी व आयपीएल सामन्यातही पंचाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष दिलीप माने, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, सेक्रेटरी धैर्यशील मोहिते-पाटील व चंद्रकांत रेबर्सो यांनी शुभेच्छा दिल्या.
———




















