बार्शी – येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे आज भगवान महावीर जयंतीनिमित्त बार्शी शहरातील गोरगरिबांना १०१ चप्पलांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. पद्ममभाई कांकरिया, अशोकभाई श्रीश्रीमाळ, प्रवीणभाई पुनमिया, प्रमोदभाई वखारिया यांचे हस्ते गोरगरिबांना चप्पलांचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, ऑ.सेक्रेटरी आनंद पुनमिया, संचालक धिरज कुंकूलोळ, आनंद सुराणा, प्रमोद भंडारी, श्री जैनाश्रमचे अध्यक्ष जयचंद सुराणा, ऑ.सेक्रेटरी ॲड. दिनेश श्रीश्रीमाळ, गौतमचंद बोथरा, अशोक कुंकूलोळ, अशोक,सुराणा, माणीकभाऊ सुराणा, राहुल दुगड, किरण श्रीश्रीमाळ, यश कुंकूलोळ हे उपस्थित होते. या कार्यक्रमास माझी आमदार राजाभाऊ राऊत, बार्शी नगरपालिकाच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, प्रशांत कथले यांनी भेट दिली. कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा.ग्रंथपाल सौ शितल लुकडे, क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















