पंढरपूर – येथील शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान यांच्या वतीने राम कृष्ण हरी वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी ५०० लिटर क्षमतेचा नवीन गरम पाण्याचा सोलर भेट देण्यात आला.
राम कृष्ण हरी वृद्धाश्रमात सुमारे ४० वृद्ध महिला व पुरुष वास्तव्यास आहेत.
प्रतिष्ठानचे सचिव अमित गोसावी यांनी वृद्धाश्रमास भेट दिली असता, तेथील वृद्धांनी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन सोलर बसवून देण्याची विनंती केली. वृद्धांची ही गरज लक्षात घेऊन प्रतिष्ठानने पुढाकार घेत पूर्णपणे नवीन ५०० लिटर क्षमतेचा सोलर वृद्धाश्रमास भेट दिला.
सोलरची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमातील सर्व महिला व पुरुषांची भेट घेऊन सोलरच्या वापराबाबत माहिती दिली. गरम पाण्याची सुविधा मिळाल्याने वृद्धांनी आनंद व्यक्त करत प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरपिता मुन्ना गिरी गोसावी, उपाध्यक्ष वृंदादेवी गोसावी, सचिव अमित गोसावी, सहसचिव महेश म्हेत्रे, अनमित्रा गोसावी तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 10