लातूर जिल्ह्यात अवैध धंदे, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. शनिवार दि. २५ रोजी पहाटे ४.१० वा. लामजना ते तुळजापूर टी पॉईंट मार्गे आयशर टेम्पो क्र. टीएस१२ यूई ४१९० मधून सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री साठी जात होता. पोलिसांनी या वाहन चालकाने चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी या वाहनांची झडती घेतली असता टेम्पो मध्ये एस एम ५०० ग्राम सुगंधित तंबाखू ची ३५ पोती १७ लाख ४९ हजार ५००रूपये, बाबा ब्लॅक सुगंधी तंबाखू ५पोती ४लाख १५ हजार ८६० रूपये,एम एस सुगंधित तंबाखू ची दोन पोती ९९हजार ५०० रूपये,बाबा ब्लॅक तंबाखू ५ पोती ५लाख ५५हजार ,राजरत्न किमामचे २ बॉक्स ७७हजार २००रूपये असा २८ लाख ९७ हजार ६०० रूपये व टेम्पो ११लाख ५०हजार रूपये असा ४० लाख ४७हजार६०रूपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















