सोलापूर – शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयच्या सतरा वर्षाखालील संघाने पुणे विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. तसेच शहर क्रिकेट स्पर्धेत 19 वर्षाखालील मुली,17 वर्षाखालील मुली, 19 वर्षाखालील मुले आणि 17 वर्षाखालील मुले अशा चार गटात विजेतेपद मिळवले.
अकलूज येथील महर्षी शंकरराव मोहिते पाटील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत त्यांनी प्रथम अहिल्यानगर शहर, सोलापूर ग्रामीणवर विजय मिळविले आणि अंतिम सामना पिंपरी चिंचवडसोबत झाला. या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात पिंपरी चिंचवडने बाजी मारली. त्यामुळे सोलापूर शहर संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या संघास क्रीडा शिक्षक माणिक साळसकर, प्रमोद चुंगे, अक्षय गवळी आणि मार्गदर्शक प्रकाश कंपली यांचे मार्गदर्शन लाभले. संघांचे शाळा समितीचे अध्यक्ष सुरेशबाबु मंकणी, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
उपविजयी संघ : कर्णधार मयंक पात्रे,अभिजीत सरवदे, हुच्चेश्वर कांबळे, गोविंद पुंजाल, ययाती देवकते, सुबोध वाघमारे, यश गुजले, हर्ष दाणी, यश पवार, आरुष अध्यापक, आयुष गोटीवाले,ओंकार चव्हाण, सार्थक कन्ना, प्रणव माने, आवेज मुल्ला, प्रसन्न नंदर्गी.
——-



















