सोलापूर:- महाराष्ट्रातील कक्कया (ढोर) समाजातील कलाकार आणि साहित्यिकांची प्रथमच कक्कय्या कला- साहित्य परिषद, सोलापूर.( महाराष्ट्र) या नावाने संस्था स्थापन झाली आहे. ही संस्था धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर झाली आहे.उद्देश असा की लोकसंख्येने मायक्रोतला मायक्रो असणाऱ्या समाजातील लेखक, कवी, कलावंत यांनी एकत्र यावे,नव्या विचारांचा जागर व्हावा. सकस कला आणि साहित्य लेखन निर्माण व्हावे हा आहे. ही परिषद मराठी भाषा संवर्धन, साहित्य, कला लोकसंस्कृती संदर्भात कार्य करण्यासाठी नव्याने स्थापन झालेले आहे. या सर्व लेखक कलावंतांनी निर्माण केलेले कोरीव अक्षर लेणं समाजाने पहावे,वाचावे व समष्टीला दिशा मिळावी हा हेतू आहे. कलेचा आणि समाजातील लेखकाने लिहिलेल्या साहित्याचा युवापिढीसाठी प्रचार आणि प्रसार व्हावा हा ही हेतू आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात या समाजाची अशा स्वरूपाची पहिली परिषद आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा डॉ.अर्जुन व्हटकर यांची निवड झाली आहे.ते ज्येष्ठ साहित्यिक असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या दोन पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच मध्यप्रदेश शासनाच्या भोपाळ साहित्य अकादमी तर्फे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.तसेच महाराष्ट्रातील अनेक पुरस्कार त्यांच्या साहित्यकृतीला मिळालेले आहेत .
“ढोर समाजाचे कला आणि साहित्यातील योगदान”या विषयावर व्यापक विचारमंथन होणार आहे.दिवसभर चालणाऱ्या या कला-साहित्याच्या उत्सवात ग्रंथदिंडी, उद्घाघाटन, परिसंवाद,प्रकट मुलाखत, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समारोप सत्राने संमेलनाची सांगता होणार आहे. संमेलनाच्या नियोजनासाठी अलीकडेच पुणे येथे बैठक संपन्न झाली. महाराष्ट्रातील विविध भागातील समितीच्या सर्व सदस्यांनी तसेच कार्यकारी मंडळांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन सेक्रेटरी रमाकांत नारायणे मुंबई केले आहे.
——
Post Views: 15