जालना : जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यालयात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदानाला उजाळा देण्यात आला. यावेळी जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर परिवर्तन गट स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच ‘हक्काच्या जालना शहर’ या जनसंपर्क व जनआंदोलन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभाग व वॉर्डात जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांच्या समस्या, पाणीपुरवठा, वीज, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा यांसह विविध नागरी प्रश्नांबाबत नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी व मागण्या संकलित केल्या जाणार आहेत. त्यानंतर संबंधित प्रश्न प्रशासनापुढे मांडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राजीव गांधी यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आगामी काळात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक विनायक चिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, करीम बिल्डर, आरिफ खान, शिवम जैस्वाल, ॲड. रामेश्वर गावणे, योगेश कदम, वसीम खान, दिनेश सुराणा, चंद्रकांत रत्नपारखे, श्लोक अग्रवाल, देवराज डोंगरे, कलीम खान, शेख वसीम, जमीर शेख, इम्रान खान, वैभव निर्मल, रज्जाक शेख, माऊली हिंगोले, नूर मोहम्मद, ज्ञानेश्वर पाटील, सार्थक मेंढरे, आदित्य कांबळे, अंकुश शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुवीर गुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृष्णा पडुळ यांनी केले.
——–
चौकट…..
जालना शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, वीज यांसह नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाचा आवाज काँग्रेसच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचविला जाईल. ‘हक्काच्या जालना शहर’ अभियानातून प्रत्येक वॉर्डातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. केवळ समस्या ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस ठामपणे संघर्ष करेल.
– डॉ. विशाल धानुरे, महानगर जिल्हाध्यक्ष