बार्शी – येरमाळा रस्त्यावर मंगळवार, दि. २६ मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. येरमाळावरुन बार्शीकडे येत असताना पिंपळवाडीच्या पुढील बाजूस अज्ञात वाहनाने हिरो स्प्लेंडर (क्र. एमएच १३ सीव्ही २०८९) या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ज्योतीराम संभाजी नवले (वय २७, रा. कांदलगाव, ता. बार्शी) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलीस ठाण्याचे सपोनि साईनाथ सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक मांजरे तसेच पोलीस कर्मचारी राहुल आलाट, आशिष सानप, रामेश्वर शिंदे, संगम वडले, बळीराम बेद्रे आणि कृष्णा नागरगोजे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत ज्योतीराम नवले हे आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र असल्याने त्यांच्या अकाली निधनाने कांदलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पांगरी पोलिसांकडून तपास वेगाने करण्यात येत आहे.
Post Views: 19