पिलीव – महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत .माञ यंदा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्यामुळे गळीत हंगाम किती दिवस चालतो याकडे लक्ष असतानाच गळीत हंगाम सुरु होऊन दहा दिवस होऊन गेले तरीपण कोणत्याही कारखानदारांनी नेटाने गळीत हंगाम सुरु ठेवला आहे. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक आंदोलनाला न जुमानताच गळीत हंगाम सुरु आहे. शेतकरी दुष्काळात होरपळत आहेत सध्या पाणी नसल्यामुळे ऊस वेळेत गाळपास जाणे गरजेचे आहे. यामुळेच शेतकरी दराचा विचार न करताच ऊस गाळपास देत आहे. यंदा बाजारात साखरेला पन्नास रुपयांच्या वर दर आहे यामुळेच शेतकरी ऊसाला चांगला दर मिळेल ही अपेक्षा बाळगून आहे. किमान 3500 रुपये पहीला हप्ता मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर शेतकरी संघटना 4500 रुपये पहीला हप्ता द्यावा या भुमीकेत आहेत. पण शेतकऱ्यांसमोर सध्या पाणी नसल्यामुळे ऊस जळुन जातोय की काय ही भिती निर्माण झाली आहे यामुळेच शेतकरी दराचा विचार न करताच ऊस गाळपास देत आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहेच पण पाण्यावाचून ऊस वाळुन जातोय की काय अशी मोठी भिती शेतकऱ्यांमधुन व्यक्त होत आहे.बाजारात सध्या साखरेला दर चांगला आहे सध्या दिवाळी सण तोंडावर आला आहे यामुळे साखरेला आवक चांगली आहे .आणी यापुढे सुद्धा आवक चांगलीच राहणार आहे.चांगल्या दराचा कारखानदारांना लाभ न होता शेतकऱ्याना होणे आवश्यक आहे. ऊस उत्पादनासाठी आवश्यक असणारा वाढता खर्च मजुरी, खते, औषधे, सिंचन, वाहतुक व इतर सर्व खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांना 4000 रुपयाच्या पुढे दर मिळणे अपेक्षित आहे.यंदा पाऊस नसल्यामुळे उत्पादनात प्रचंड मोठी घट झाली आहे. साखर कारखानदार आम्ही इतर कारखान्याच्या बरोबरीने चांगला दर देणार असे सर्वच कारखानदार म्हणत असुन फक्त एकमेकावर ढकलत आहेत. पण दर जाहीर करणयासाठी कोणताच सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार पुढे येत नाही. सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व कारखानदारांची दराबाबत मिलीभगत असुन त्यांची गुप्त बैठक झाल्याची खाञीशीर वृत आहे. अनेक शेतकरी अजूनही कोणता कारखाना चांगला दर जाहीर करतोय याकडे लक्ष ठेवुन आहे. शेतकरी संघटना 4500 रुपये दर मिळण्याबाबत प्रयत्नशील कारण साखरेला पन्नास रुपयांपर्यंत दर राहीला व इथेनॉल 70 रुपयांपर्यंत दर राहीला तर शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्य आहे. यासाठी केंद्र स्तरावर एक समीती गठीत करण्यात आली आहे. गाळपास गेलेल्या ऊसास 14 दिवसाच्या आत बिल देणे बंधनकारक असते .हंगाम सुरु होऊन दहा दिवस झाले आहेत यामुळे पुढील चार दिवसात शेतकऱ्यांना बिल देणे बंधनकारक आहे. यामुळे कोणता कारखाना पहीला हप्ता किती देणार याचे चित्र स्पष्ट होईल. चौकट _ पिलीव परीसरातील सुळेवाडी ,बचेरी, शिंगोर्णी या गावातील ऊस सध्या जळुन चालले असुन सदर ऊसास कमी दर देण्याचा घाट काही कारखान्यांनी घातला आहे. दुष्काळात अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणयाऐवजी जास्तच अडचणीत टाकण्याचे काम कारखानदार करीत आहेत. जळुन चाललेल्या ऊसास कमी दर देणार असे कारखाना प्रशासन बोलत असल्याचे सुळेवाडी येथील शेतकऱ्यांनी सांगीतले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















