करमाळा – करमाळा येथील पवित्राबाई उर्फ म्हाका गोविंद कांबळे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या १०९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. सकाळी सुमारे ९.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कांबळे परिवारावर शोककळा पसरली असून, आप्तेष्ट व परिचितांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पवित्राबाई यांनी दीर्घ आयुष्य जगत कुटुंबातील अनेक पिढ्या पाहिल्या. कुटुंबातील सदस्यांना त्यांनी मायेची सावली देत आयुष्यभर आधार दिला. त्यांच्या निधनाने परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
पवित्राबाई उर्फ म्हाका कांबळे यांच्या पार्थिवावर करमाळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच परिचित उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पाच मुले, पाच सुना, नातवंडे, पणतू, खापर पणतू तसेच भाऊ असा मोठा परिवार आहे. त्या शाहीर बन्सी गोविंद कांबळे, गोपाल कांबळे, दशरथ कांबळे, आजिनाथ कांबळे आणि गोरख कांबळे यांच्या मातोश्री होत.
वयाच्या १०९व्या वर्षी त्यांच्या निधनाने कांबळे परिवाराने आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ आधारवड गमावला असून, त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे
Post Views: 16