भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग , सोलापूर येथे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना आगामी प्लेसमेंट प्रक्रियेसाठी साक्षम करण्याच्या उद्देशाने पाच दिवसीय प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्टॉप स्किल, कम्युनिकेशन स्किल, इंटरव्यू स्किन, ग्रुप डिस्कशन ,प्रेझेंटेशन स्किल, टर्मर लीडरशिप तसेच व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित विविध कौशल्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील विविध संधीसाठी तयार करणे आणि त्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने टी .पी .ओ. चे प्रमुख ए .वाय. मकानदार प्रथम वर्ष विभाग प्रमुख स्नेहल शिंदे तसेच प्रशिक्षणासाठी आमंत्रित ट्रेनर नम्रता सिंग उपस्थित होते. नम्रता सिंग या पुणे येथील असून त्यांना कॉर्पोरेट प्रशिक्षण क्षेत्रातील बारा वर्षाहून अधिक काळाचा अनुभव आहे. विविध कॉर्पोरेट प्रशिक्षण उपक्रमांमधून त्यांनी विद्यार्थी तसेच व्यवसायिकांना आवश्यक कौशल्याची प्रशिक्षण दिले आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभवाचा आणि उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शनाचा निश्चितच विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. विशेषता मुलाखतीला सामोरे जाणे, प्रभावी संवाद साधने, आत्मविश्वास वाढवणे आणि प्लेसमेंट प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करणे यासाठी त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढण्यास तसेच आगामी कॅम्पस प्लेसमेंट मध्ये अधिक चांगला संधी मिळवण्यास निश्चितच मदत होणार आहे. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.अनिल देशमाने यांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून आजच्या स्वर्गात्मक युगात प्रभावी संवाद कौशल्य, आत्मविश्वास ,सकारात्मक दृष्टिकोन, टीमवर्क नेतृत्व गुण आणि मुलाखतीला सामोरे जाण्याची क्षमता या बाबी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या पाच दिवशीय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणावा असे आव्हान त्यांनी केले. प्रशिक्षण दरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती संवादात्मक उपक्रम आणि विविध सरावाच्या माध्यमातून आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढण्यास तसेच आगामी कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत प्रभावीपणे सहभागी होण्यास मोठी मदत होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. नेहा इनामदार यांनी केले. या उपक्रमास अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून नम्रता सिंग यांच्या बारा वर्षाहून अधिक कार्पोरेट प्रशिक्षण अनुभवातून विद्यार्थ्यांना मिळणारे मार्गदर्शन त्यांच्या प्रेसमेंटच्या दृष्टीने निश्चितच मोलाचे ठरणार आहे. या विद्यार्थ्यांच्या उज्वल करिअर साठी आप्पा दिवसीय प्रशिक्षण उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार असून विद्यार्थ्यांना उत्तम प्लेसमेंट मिळवण्यासाठी या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे.