वळसंग – तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री बसवेश्वर मंदिराजवळ नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शुद्ध तसेच थंड पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून दि.१८ ऑक्टोबर रविवार रोजी समर्थ जल कोल्ड वॉटर झार प्लांटचे प्रवीण रमेश बागलकोटी व बागलकोटी परिवार यांच्या वतीने उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच श्रीशैल दुधगी, माजी उपसरपंच मल्लिनाथ बाबानगरे,दीपक हेरलगी, ग्रामपंचायत सदस्य विनोद सुरपुरे, श्रीशैल भुसणगी,माजी ग्राम. सदस्य प्रकाश दुधगी,चंद्रशेखर केशट्टी,महेश दूधगी, श्रीशैल भैरामडगी,मुख्याध्यापक वीरेश थळंगे, सिद्धाराम वाघमारे,विनोद कुर्ले, रवी हिरेमठ, महेश दूधगी, भद्रय्या स्वामी,डॉ. मोहशीन मणुरे, शंकर दुधगी, शिवानंद घोडके, योगीनाथ कलशेट्टी व इतर गावातील मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 10