श्रीपूर – निरंकुश सत्तेच्या माध्यमातून अिग्रजांनी भारतातील जनतेवर अनन्वीत अत्याचार केला शिवाय देशाला लुटले . इंग्रजांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीकार भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आजाद , चाफेकर बंधू ,कांतीसिंह नाना पाटील या सारख्या असंख्य शुरविर क्रांतीकारकांनी आपले सर्वस्व अर्पुन प्राणाचे बलिदान दिले . क्रांतीकारकांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्यं आपण विसरून चालणार नाही असे प्रतिपादन महाळुंग – श्रीपूरच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण यांनी काढले .
महाळुंग येथिल जिल्हा परिषद शाळेच्या स्वातंत्रदिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या .
प्रथम त्यांचे हस्ते ध्वज फडकविणेत येवून मानवंदना देण्यात आली .
या प्रसंगी पै . अशोक चव्हाण, रमेश देवकर, सागर यादव, सुधीर भोसले, भगवान भोसले, रणजित नवगिरे नामदेव मुंडकणे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते .
कार्यक्रमा नंतर सर्व विद्यार्थ्यांना मि मिष्ठान्न भोजन देण्यात आले .
Post Views: 7