शनिवार दि.१५/८/२०२६ रोजी शि.प्र मंडळीच्या कै.वि.मो. मेहता प्राथमिक शाळेच्या भव्य प्रांगणात प्रमुख अतिथी मा. डॉ. श्री. शैलेश पाटील ( हृदयरोगतज्ञ) यांच्या शुभहस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शिशु शाळेच्या मुख्या. मा.सौ. आकांक्षा आराध्ये, प्राथमिक शाळेच्या मुख्या. मा.सौ.सीमा कोरवलीकर व माध्यमिक शाळेच्या मुख्या. मा.सौ श्रुती बागेवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण होताच विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,राज्यगीत, ध्वजगीत ,प्रतिज्ञा व तिरंगाशपथ म्हटली. प्राथमिक शाळेच्या मुख्या. मा.सौ .सीमा कोरवलीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत देशासाठी लढणाऱ्या या अनंत वीरांना सलाम करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .प्रमुख अतिथींचा परिचय सौ. मयुरी दुरुगकर यांनी करुन दिला.व्यासपीठावरील मान्यवरांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळेत अतिशय रंगतदार व उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथमतः शिशु शाळेतील विद्यार्थ्यांनी *जय जवान सैनिका* ह्या गीतावर नृत्य सादर केले. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी *वंदे मातरम* या गाण्यावर समूह नृत्य सादर केले . माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी *फिर आज भुजाये फडक उठी* हे समूह गीत सादर केले. शिशु शाळेतील कु. हेरकर श्रेष्ठा,प्राथमिक शाळेतील कु. अंधारे माणिकर्णिका , माध्यमिक शाळेतील कु. चव्हाण तीर्थशा या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. डॉ. शैलेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून हुतात्मा ची आहुती आपण विसरून चालणार नाही, तिरंगा आपल्याला भाग्याने मिळाला आहे, असे सांगत भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले .शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री अनिल बरवे व नियामक मंडळ सदस्य श्री सुरेशबाबाबु मंकणी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम् गीत गायले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. सुनेत्रा मोहोळकर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.शितल जालीमींचे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.’
Post Views: 9