Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यमाई तलाव परिसरातील दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कडक उपाय योजना करणे गरजेचे

तरुण भारतbyतरुण भारत
March 19, 2026
in editor
0
यमाई तलाव परिसरातील दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कडक उपाय योजना करणे गरजेचे
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील यमाई तलाव परिसरा मध्ये होत असलेली वृक्षतोड आणि माणसांची वर्दळ वाढल्यामुळे तलाव परिसरातील विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्षांना धोका पोहचण्याची भिती निर्माण झाली आहे. या बरोबरच दुर्मिळ पक्ष्यांच्या दिवसाढवळ्या शिकारी देखील केल्या जात आहेत. या परिसरातील अनेक पक्षी सध्या इतरत्र स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे यमाई तलाव परिसरात पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन विविध उपाय योजण्याची गरज असल्याचे मत निसर्गप्रेमी नागरिक तसेच पक्षीमित्रांकडून व्यक्त केली जात आहे.


येथील यमाई तलाव परिसरा मध्ये पूर्वीपासून विविध प्रकारचे दुर्मिळ पक्षी वास्तव्यास असतात. या परिसरात पूर्वी काटेरी बाभळी तसेच विविध प्रकारच्या वृक्षांची दाटीयामुळे पक्ष्यांसाठी येथील वास्तव्य सुखकर होते. मात्र गेल्या काही वर्षापासून या परिसराचा पालिकेने विकास करण्याचे काम हाती घेतलेले आहे. तलावा मधील पाण्यात बोटींग आणि या परिसरात दिसणारे विविध पक्षी नागरिकांना पाहण्यासाठी वाँच टाँवर आदी कामे अद्यापही प्रलंबित आहेत. त्या मध्येच या तलावाच्या बाजूलाच वनविभागाकडून तुळशीवृदांवन देखील तयार करण्यात आलेले आहे. 


या संपुर्ण तलावाच्या परिसरात चार ते पाच किलोमीटर एवढा चालण्यासाठी पालिकेकडून ट्रक तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्यायामासाठी, फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांपेक्षा उपद्रवी लोकांचा वावर या भागा मध्ये जास्त झाला आहे. या उपद्रवी मंडळींकडून या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून येथील विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तव्यास धोका पोहचून त्यांचे वास्तव धोक्यात आले आहे. यावर पालिकेने योग्य उपाय योजून या दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाय योजण्याची गरज असल्याची मागणी निसर्गप्रेमी नागरिक तसेच पक्षीमित्रांकडून केली जात आहे.


तलाव परिसरातील स्थानिक व स्थलांतरित पक्षी
पेटेंड स्टाँर्क (रंगीत करकोचा), म्यून बील (चमचा बदक), आयवीस (पांढरे व काळे बदक ) स्पाँटेंड बील ( ठिपक्यांचे बदक), रिर्व्हर टर्न ( नदी सुरव), कुट (वारकरी बदक), सँडपायपर (तुतवार), टिटवी, बगळे ( साधे व गाय बगळे), मार्श हँरिअर (दलदल ससाणे), शिकरा, जांभळी पाणकोंबड्या,  डँबचिक (पाणबुडी), फ्लोमिंगो, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, खंड्या, बंड्या अशा प्रकारचे एकुण चौसष्ठ स्थानिक पक्षी तर चक्रवाक, थापट्या, रोकाट्या, तुरमती ससाणा, गुलाबी मैना, धोबी गार्गनी आदी चेवेचाळीस स्थलांतरित पक्षी यमाई तलाव परिसरात आढळून येतात.
——————–


पक्ष्यांची पैदास धोक्यात
यमाई तलावाच्या मधल्या दोन्ही बेटांवर काटेरी बाभळी उगविल्या आहेत. तेथेच सुरक्षित अधिवास म्हणून करकोट्यांची प्रतिवर्षी पन्नास ते साठ घरटी होतात. पाणी कमी झाल्यामुळे उपद्रवी व्यक्ती सहजपणे बेटावर जावून पक्ष्यांच्या शिकारी करतात. घरट्यांमधील अंडी चोरतात. ही काटेरी बाभळीच्या झाडे तोडल्यामुळे घरट्यांना देखील धोका होत आहे. त्यामुळे नवीन पक्ष्यांची पैदास धोक्यात आली आहे.
———————-

दिवसाढवळ्या पक्ष्यांची होते आहे शिकार
या भागात अस्ताव्यस्त पडलेले पक्ष्यांची पिसे, मोडून पडलेल्या त्यांच्या माना, पक्ष्यांचे मोठाले पाय पडल्याचे सर्रास दिसून येतात. त्यामुळे पक्ष्यांच्या शिकारी देखील करण्यात येत आहेत. बाभळी सारख्या काटेरी झाडांवरील पक्ष्यांच्या घरट्यातून पक्ष्यांनी घातलेल्या अंड्याच्या देखील चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. 
—————————


या उपाय योजना करणे आहे शक्य
यमाई तलाव परिसरा मध्ये पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या वृक्षांची लागवड करणे गरेजेचे. बेटाच्या बाजूने खंदक किंवा चर काढावी. बेसुमार वृक्षतोड थांबवावी. तारेचे कुंपण सर्व बाजूंनी बंधिस्त करावे. पक्षी निरीक्षणासाठी वाँट टाँवरची उभारणी करावी. पक्ष्यांच्या ठिकाणी मनुष्याची वर्दळ टाळावी. कायम पाणी पातळी राहिल याची दक्षता घ्यावी.

Post Views: 41
Previous Post

“लक्ष्मीबाईंच्या अश्रूंमधून उभा राहिला रयतचा वटवृक्ष” – प्रा. पोपट काटकर

Next Post

श्रीराम जन्मोत्सव समितीचा हिंदू शौर्य पुरस्कार मिलिंद एकबोटे आणि साध्वी सारिका परमानंद यांना जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्रीराम जन्मोत्सव समितीचा हिंदू शौर्य पुरस्कार मिलिंद एकबोटे आणि साध्वी सारिका परमानंद यांना जाहीर

श्रीराम जन्मोत्सव समितीचा हिंदू शौर्य पुरस्कार मिलिंद एकबोटे आणि साध्वी सारिका परमानंद यांना जाहीर

ताज्या बातम्या

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0958427

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!