सोलापूर – श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर यांच्यावतीने नाट्य चित्रपट संगीत अशा विविध विषयांवर सातत्याने लेखन केल्याबद्दल सुप्रसिध्द पत्रकार अंबरीश मिश्र यांना “कलास्वाद पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्रदान समारंभानंतर सोलापूर फिल्म सोसायटीच्यावतीने श्रेष्ठ संगीतकार मदन मोहन यांच्या गाण्यावरचा दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित केला असून त्याचं निरुपण सुप्रसिध्द लेखक सिनेअभ्यासक, पत्रकार अंबरीश मिश्र करणार आहेत.
हा कार्यक्रम वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात रविवार दि. 07 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिक श्रोत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर व सोलापूर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नवनीत तोष्णीवाल यांनी केले आहे.























