श्रीपूर – येथिल चंदशेखर विद्यालयात इंग्लीश मीडियम स्कुलच्या क्रिडा सह शिक्षिका करुणा धाईंजे यांना सोलापूर शहर – जिल्हा शारीरिक रिक्षण, क्रिडा शिक्षक महासंघ व स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने करुणा धाईंजे यांना आदर्श क्रिडा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . या प्रसंगी त्यांच्या मातोश्री सिंधू मधूकर धाईंजे यांचाही सन्मान करण्यात आला .
पुरस्कार संस्थेचे जिल्हा अध्यक्ष संतोष खेंडे, शहर अध्यक्ष सुहास छंच्युरे, प्रा . राज्य समन्वयक भारत इंगवले यांच्या हस्ते देण्यात आला . चंद्रशेखर विद्यालयाची माजी विद्यार्थीनी असलेल्या करुणा धाईंजे यांना शालेय जीवना पासून क्रिडाप्रकाराची आवड होती . कब्बड्डी , भालाफेक, धावणे, यामध्ये त्यांनी अनेक जिल्हा व राज्य स्तरीय पुरस्कार पटकावले आहेत . अगदी सामान्य कुटूंबातून येवून कोणतीही साधने नसताना तिने हे यश मिळवले होते . त्यामुळे आज आदर्श क्रिडा पुरस्कार मिळल्याचे समाधान वाटत असल्याची भावना करुणा धाईंजे यांनी बोलन दाखवली .
या प्रसंगी मुलगा अविष्कार जाधव , चंद्रशेखर विद्यालयाचे शिक्षक हणमंत मोरे , गुरवसर, विजयकुमार केचे,बंडगरसर, आनंद जोशी उपस्थित होते .
याप्रसंगी आबासाहेब चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ . रामदास देशमुख , प्रा . पांडुरंग बनसोडे व सर्व शिक्षक स्टाफ यांनी करुणा धाईंजे यांचे अभिनंदन केले .

Post Views: 21