पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात बहीण _ भावाच्या अतुट पवित्र असा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या सणानिमित्त पिलीव बाजारपेठेत अगदी सकाळपासून राञी उशीरापर्यंत मोठी गर्दी दिसुन येत होती .आज पिलीव व आसपासच्या परीसरातील सर्वच गावात आलेल्या बहीणीनी आपल्या भावाला राखी बांधण्या अगोदर किंवा राखी बांधल्यानंतर पिलीव येथील महालक्ष्मीचे दर्शन घेतली याठिकाणी दर्शन घेण्यासाठी बहीनीनी पौर्णिमेनिमित्त मोठी गर्दी केली होती .रक्षाबंधन सण व पोर्णिमा असा दुग्ध शर्करा योग आजच्या रक्षाबंधनानिमीत जुळुन आला .तसेच पिलीव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात राखीचे स्टाॅल उभारण्यात आले होते .या स्टाॅलवर आज सकाळपासून रात्री उशीरापर्यंत वेगवेगळ्या आर्कषक राख्या खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती .रक्षाबंधन सणामुळे, शाळा ,काॅलेजला सुट्टी असल्यामुळे मुली तसेच सासरी असणाऱ्या महीला आपल्या लाडक्या भावाला राख़ी बांधण्यासाठी एस टी बसने येत होत्या यामुळे एस टी बसेस मध्ये मोठी गर्दी पाहावयास मिळत होती .पिलीव परीसरातील बसस्थानक परिसर तसेच आसपासच्या गावातील सर्वच रस्त्यावर राञी उशीरापर्यंत मोठी गर्दी दिसुन येत होती .भाऊ आपल्या बहीणींना साडी किंवा सोने _ चांदीच्या वस्तु भेट म्हणून देतात यामुळे दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होती .तसे फळ विक्री करणाऱ्या स्टाॅलवर सुद्धा मोठी गर्दी होती .या बहीण _ भावाच्या प्रेमळ व अतुट बंधनाच्या सणानिमित्त बहीणींनी आपल्या भावाच्या मनगटावर पेढे भरवित किंवा साखर चारुन, ओवाळुन राखी बांधत त्यांची सुरक्षितता , उदंड आयुष्य,व आरोग्यमय यशस्वी जिवनासाठी शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधन सण म्हणजे खरेतर बहीण _ भावामधील प्रेम, विश्वास, आपुलकी, माया याचे अतुट असे पवित्र बंधन आहे.हेच या सणाच्या निमित्ताने अनुभवायास मिळते.यामध्ये अनेकांना सख्ख्या बहीणी नसूनही चुलत बहीणी ,मावस बहीणी ,तसेच मानलेल्या बहीणीनी आपल्या भावाला अगदी प्रेमाने राखी बांधत बहीणीची कसलीच उणीव भासु न दिल्याचे या निमित्ताने पाहवयास मिळाले.रक्षाबंधन व दीपावलीच्या वेळेस असणारी भाऊबिज हे दोन सण भाऊ _ बहीणीमधील अतुट असे सण साजरे केले जातात. सोशल मिडीयावर ही रक्षाबंधनानिमीत शुभेच्छांचा अक्षरश वर्षाव पाहवयास मिळाला.पिलीव परीसरात अधुन मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या तरीही बहीणीनी आपल्या भावाला राखी बांधण्याचे अजिबात टाळले नाही .पिलीव परीसरात असा हा बहीण भावामधील पवित्र बंधन असणारा रक्षाबंधन लहानपणापासून _ मोठ्यापर्यत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फोटो _ पिलीव येथे रक्षाबंधन सणानिमित्त बहीण आपल्या भावाला राखी बांधताना.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















