पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरातील अनेक शेतकरी केंद्र शासनाची प्रधानमंञी किसान सन्मान योजना तर महाराष्ट्र शासनाची नमो किसान सन्मान योजनेपासुन वंचीत आहेत.शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी ह्या महतवकांक्षी योजना सुरु केल्या आहेत. पण गेल्या दीड दोन वर्षांपासुन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वरचेवर हप्ते न मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.तहसील कार्यालय व कृषी कार्यालयाकडे शेतकरी या योजनेचे हप्ते सुरु करण्यासाठी हेलपाटे मारीत आहेत पण योग्य मार्गदर्शन किंवा माहीती न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना पाठपुरावा करणे शक्य होत नाही.पिलीव परीसरातील अनेक शेतकरी यासाठी चौकशी करण्यासाठी तहसील कार्यालयात जातात तेथील अधिकारी म्हणतात कृषी कार्यालयात जावा तयाठिकाणी गेल्यानंतर तुम्ही सेतु कार्यालयात जावा त्याठिकाणी ऑनलाईन करा असे सांगीतले जाते .

ऑनलाईन करुन सदरचा प्रस्ताव दाखल करूनही दोन वर्ष झाले तरीही सदरचा प्रस्ताव अद्यापपर्यंत मंजुरच झाला नाही.शेतकरी दोन्ही कार्यालयाचे हेलपाटे झिजवुन झिजवुन अक्षरश हतबल झाले आहेत. तरीही शेतकऱ्यांना काही केले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांसाठीची ही योजना चालुच होईना अशी विदारक परिस्थिती आहे .सध्या याबाबत जिल्ह्य अधिकारी लक्ष देऊन ताबडतोब शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहेत. केवळ कृषी खात्यातील अधिकारी लक्ष देत नसल्यामुळेच शेतकरी या महत्वाकांक्षी योजनेपासुन शेतकरी वंचीत आहेत. चौकट _ अधिकाऱ्यांच्या गलनाथ कारभारामुळेच शेतकरी सदरच्या दोन्ही योजनेपासुन पुर्ण पणे वंचीत आहेत _ रामचंद्र पवार, कुसमोड.























