सोलापूर : रो. मितेश पंचमिया अध्यक्षपदी तर रो.पार्थ दावडा सचिवपदी. शहरातील ९० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वर्ष २०२६-२७ च्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार दि. ५ जुलै २०२६ रोजी सायं.६ वाजता श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ सभागृहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत ३०६० धुळे चे रो.अशिष अजमेरा, प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष मितेश पंचमिया व नूतन सचिव रोटेरियन पार्थ दावडा यांच्यासह नवीन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२चे प्रांतपाल रो.जयेश पटेल व प्रथम महिला रो.पारुल पटेल, साहाय्यक प्रांतपाल चार्वाक बुरगुल यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. रोटरी क्लब ऑफ सोलापूर हा त्यांचा होम क्लब असल्याने हा सोहळा अधिक विशेष ठरणार आहे. या प्रसंगी मावळत्या अध्यक्षा रो. धनश्री केळकर व मावळते सचिव रो.निलेश फोफलिया हे नवीन कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्द करतील. पीडीजी राजीव प्रधान, पीडीजी झुबीन अमरिया, आदी पण उपस्तीत असणार आहे.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ हा महाराष्ट्रातील ११ महसुली जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सोलापूर, सातारा, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर तसेच इतर जिल्ह्यांमधील शेकडो रोटरी क्लब समाजहिताचे विविध सेवा प्रकल्प राबवत आहेत. या विशाल रोटरी परिवाराचे नेतृत्व यावर्षी प्रांतपाल रोटेरियन जयेश पटेल करत आहेत. रोटरी क्लब ऑफ सोलापूरने गेल्या अनेक वर्षांत समाजोपयोगी उपक्रमांची समृद्ध परंपरा निर्माण केली आहे. विशेषतः अन्नपूर्णा योजना, रोटरी-रेडक्रॉस थॅलेसेमिया सेंटर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रकल्प, डिजिटल क्लासरूम, ‘आशा’ कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन, रोजगार मेळावा (Job Fair) तसेच पर्यावरण संवर्धनासाठी मियावाकी वृक्षारोपण प्रकल्प यांसारख्या उपक्रमांद्वारे हजारो नागरिकांना थेट लाभ झाला आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवक सक्षमीकरण आणि सामाजिक सेवेमध्ये क्लबने सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. नूतन अध्यक्ष रोटेरियन मितेश पंचमिया यांनी आगामी वर्षात रोटरीच्या “Create Lasting Impact” या ब्रीदवाक्यानुसार समाजोपयोगी, शाश्वत व परिणामकारक सेवा प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या पदग्रहण सोहळ्याला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, रोटरीचे माजी प्रांतपाल, विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, रोटेरियन्स तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे करण्यात आले आहे





















