Sunday, October 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कणेरी मठ येथे अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
October 4, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
कोल्हापूर – अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे (ABPSSP) दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापूरजवळील सिद्धगिरी कणेरी मठ येथे ३ व ४ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. देशाच्या विविध राज्यांतून सुमारे साडेपाचशे पूर्व सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी अधिवेशनात सहभाग घेतला.
अधिवेशनाचे उद्घाटन सिद्धगिरी कणेरी मठाचे मठाधिपती पूजनीय श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत झाले.वंदे मातरम् आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महाराजांनी आपल्या आशीर्वचनातून राष्ट्रीय सुरक्षेमध्ये सैनिकांच्या योगदानाचे कौतुक केले. बदलती जागतिक व भूराजकीय परिस्थिती तसेच सैनिकांसमोरील नवनवीन आव्हानांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्य अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट यांच्या भाषणानंतर पूर्व सैनिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. CSD व DIAV चे अधिकारी तसेच इन्फंट्री स्कूल, बेळगावचे डेप्युटी कमांडंट ब्रिगेडियर मराठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व विविध शंकांचे निरसन केले.देशातील विविध राज्यांच्या अध्यक्षांनी आपल्या राज्यातील परिषदेच्या कार्याचा आढावा सादर केला.
परिषदेचे सदस्य ग्रुप कॅप्टन तरुण सिंघा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेल्या परमवीर चक्र विजेते शहीद अल्बर्ट एक्का यांच्या जीवनावरील चित्रपटाचा टीझर यावेळी माजी सैनिकांना दाखविण्यात आला.
सायंकाळच्या सत्रात कणेरी मठातील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी संगीत,शारीरिक कौशल्ये व विविध कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
दुसऱ्या दिवशी परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील विविध योजना व प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.यावेळी परिषदेच्या महाराष्ट्र व गोवा राज्याच्या अधिकृत वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. माजी सैनिकांच्या विविध समस्या व मागण्यांवर साधक-बाधक चर्चा करून त्या योग्य स्तरावर मांडण्यासाठी आवश्यक नियोजनावर विचारविनिमय करण्यात आला.
दरम्यान,अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल व्ही. के.चतुर्वेदी यांची पुढील तीन वर्षांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
अग्निवीरांसाठी दहा टक्के समांतर आरक्षणाचा निर्णय
समारोपाच्या सत्राला महाराष्ट्राचे माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई आवर्जून उपस्थित होते. त्यांनी माजी सैनिकांच्या नागरी जीवनातील योगदानाचे विशेष कौतुक केले.महाराष्ट्र  शासनाच्या प्रस्तावित सैनिकी मॉल,वॉर मेमोरियल तसेच माजी सैनिकांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व प्रतिनिधींना त्यांनी दिली.
अग्निवीरांच्या प्रश्नावर परिषदेने केलेल्या निवेदनाचा उल्लेख करताना महाराष्ट्र शासनाने सैनिक कल्याण विभागामार्फत अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दहा टक्के समांतर आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल व्ही.के.चतुर्वेदी यांनी समारोपाच्या भाषणातून अधिवेशनातील कामकाजाचा आढावा घेत भविष्यातील कार्यासाठी दिशादर्शन केले.
परिषदेचे मार्गदर्शक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख प्रदीप जी जोशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. माजी सैनिकांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून नवनवीन विचार,उपक्रम आणि विविध मार्गांनी राष्ट्रसेवा कशी करता येईल,याबाबत त्यांनी मंथन करण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल व्ही.के.चतुर्वेदी व  प्रदीप जोशी यांनी सैन्य मातृशक्तीसोबत विशेष संवाद साधला.जिजाऊंच्या प्रेरणेने मातृशक्तीचे राष्ट्रनिर्माणातील योगदान अधोरेखित करण्यात आले.
राष्ट्रगीताने दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता झाली.
या प्रसंगी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद चे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष एअरमार्शल प्रदीप बापट,उपाध्यक्ष एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य, ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव आणि पदाधिकारी उपस्थित होते
या भव्य अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे स्थानिक पदाधिकारी कर्नल सुळकुडे,नायक आण्णासाहेब कुंभार तसेच कोल्हापूर माजी सैनिक समूहाने परिश्रम घेतले.तसेच कणेरी मठाचे सीईओ व सर्व पदाधिकाऱ्यांचेही आयोजनासाठी मोलाचे योगदान लाभले.त्यांच्या योगदानाबद्दल विशेष आभार व्यक्त करून यथोचित सन्मान करण्यात आला.
Post Views: 8
Previous Post

कर्मवीर बाबासाहेब उर्फ मारुतराव आनंदराव माने पाटील यांची ५८ वी पुण्यतिथी साजरी

Next Post

आमदार सचिन कल्याणशेट्टी; नवलेखक – नवकवींसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आमदार सचिन कल्याणशेट्टी; नवलेखक – नवकवींसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन 

आमदार सचिन कल्याणशेट्टी; नवलेखक - नवकवींसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन 

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नुसिंह चंदेले उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने बार्शीचे दिनेशसिंह परदेशी सन्मानित

स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नुसिंह चंदेले उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने बार्शीचे दिनेशसिंह परदेशी सन्मानित

October 4, 2026
माढा महावितरण कंत्राटी कामगारांचा ७ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा

माढा महावितरण कंत्राटी कामगारांचा ७ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा

October 4, 2026
श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्योतिर्लिंग स्वामी यांची निवड

श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्योतिर्लिंग स्वामी यांची निवड

October 4, 2026
दिव्यांग रेवणसिद्ध फुलारींची गगनभरारी

दिव्यांग रेवणसिद्ध फुलारींची गगनभरारी

October 4, 2026
स्वामी विवेकानंद स्कूलच्या अजिंक्य भोसलेची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

स्वामी विवेकानंद स्कूलच्या अजिंक्य भोसलेची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

October 4, 2026
सोलापूर शहर शालेय कुस्ती स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे यश

सोलापूर शहर शालेय कुस्ती स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे यश

October 4, 2026

रूपाभवानी मंदिराकडे जाणारे रस्ते चकाचक करा

October 4, 2026
गांधी नाथा रंगजी स्कूलच्या  सोहम साबळे याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड 

गांधी नाथा रंगजी स्कूलच्या  सोहम साबळे याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड 

October 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1300692

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!