सोलापूर – पद्म नगर बास्केटबॉल अकॅडमी क्रीडांगणावर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. भारताचे महान हॉकीपटू आणि हॉकीचे जादूगार अशी ख्याती असलेले मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिन. त्यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. अमीर कोटनाल यांच्या हस्ते झाले. डॉ. कोटनाल यांचा पद्मनगर बास्केटबॉल अकॅडमीचे कोच श्रीधर गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक गुरव यांनी केले. रक्षाबंधन निमित्त सर्व मुलींनी मुलाना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. तसेच सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या वतीने पंढरपूर येथे आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार अकॅडमीचे कोच श्रीधर गायकवाड व प्रबुद्ध चिंचोलीकर यांचा तसेच पद्मनगर भागातील कार्यकर्ते असलेले सुशील नाटकर व शार्दुल कोठे आणि बंटी क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.
Post Views: 6