सोलापुर – दक्षिण सोलापूर मधील मोठी बाजारपेठ, लोकसंख्या असणाऱ्या मंद्रुपमध्ये सत्ताधारी कोरे गटाला जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयश आल्याचे दिसून येते.
नियोजन शुन्य कारभार व दिशाहीन प्रशासनामुळे गावातील नागरिक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. अंगणवाडी क्रमांक १४ च्या इमारतीला छीद्र पडल्याने व दरवाजा कुजल्यामुळे विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे. छोट्या – छोट्या समस्या निवारण होत नसल्याने नागरिकांना चकरा मारावे लागत आहेत. गावातील पाणी प्रश्नांसह वीज, रस्ता व गटारीच्या अनेक समस्या असताना ग्रामपंचायत सदस्य त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत . ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणा मुळे नागरीकांना तीन महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शिवाय अनेक वाॅर्डात दिवाबत्ती नसल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच अस्वच्छतेमुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले असून सरपंच व सदस्यांच्या मनमानी कारभाराचा फटका नागरीकांना सहन करावे लागत आहे.
वाॅर्ड क्रमांक तीन मधील अंगणवाडीत ८ महिन्यापूर्वी विषारी नाग पत्र्यावरुन अंगणवाडीत पडला होता. अंगणवाडीमध्ये सुदैवाने
अंगणवाडी सेविकेच्या सतर्कतेमुळे लहान मुलांना सर्पदंश झाले नाही. या घटनेची माहीती गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना दिल्यानंतरही त्या अंगणवाडी दुरुस्ती किंवा जाळी बसविण्यात आले नाही. याकडे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य दुर्लक्ष करीत आहेत. तेथील सेविका व पालकांनी अनेक वेळा सरपंच व सदस्यांना सांगून देखील तिथे काही उपाययोजना होताना दिसून येत नाही. सध्या अंगणवाडीचा दरवाजा खराब झाल्याने त्यातून विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांना देण्यात येणार्या खाऊही प्रश्नही उपस्थित झाला आहे.
वाॅर्ड क्रमांक तीन मध्ये तीन सदस्य असून त्यांचे अंगणवाडी कडे दुर्लक्ष झाल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सरपंचां कडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही अंगणवाडी दुरूस्ती करण्याऐवजी ग्रामसेवक बदलीसाठी त्यांचे प्रशासनाकडे पाठपुरावा दिसून येत आहे. त्यामुळे अंगणवाडीमधील लहान मुलांच्या शिक्षणासह विविध समस्या निर्माण झाले आहेत. विषारी प्राण्यांमुळे मुलांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास ग्रामपंचायतीला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा पालकांनी दिला आहे.
…
चौकट
….
ढिम्म प्रशासनाचा मुलांवर परीणाम
…
अंगणवाडीमधील समस्या सोडविण्यासाठी अनेक वेळा सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना भेटून निवेदन दिले. मात्र ग्रामपंचायतच्या ढिम्म प्रशासनामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अंगणवाडीमधील मुलांना शासनाच्या सोईसुविधा व सर्व सवलती मिळणे आवश्यक असताना ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करून दुर्दैवाने लहान मुलांच्या भविष्याशी खेळत आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी त्वरीत अंगणवाडी दुरूस्तीसाठी सूचना द्यावे.
महमद शेख, जिल्हा सचिव, काॅंग्रेस, सोलापूर
….
दरवाजाला पडलेला छीद्र






















