सोलापूर : मध्य रेल्वे सोलापूर विभागातील वाणिज्य विभाग (वरिष्ठ डीसीएम) कार्यालयीन अधीक्षक साधना शिंदे यांचा सेवानिवृत्ती निमित्त यथोचित सत्कार करण्यात आला.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू पी नायर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डिव्हिजनल सेक्रेटरी राजीव पुरुषोत्तम, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष एस.एल. कांबळे, डिव्हिन कोषाध्यक्ष विजय शांती, असिस्टंट डिव्हिजनल सेक्रेटरी अतुल सावंत, ईसीसी बँकेचे संचालक माणिकराव यमगार, ओपन लाईन सेक्रेटरी रियाज शेख, वर्किंग कमिटी मेंबर संतोष वाघमारे, हेडक्वार्टर वर्किंग कमिटी मेंबर वर्षा चांडक , एलटीआरएस चेअरमन संजय पवार, ईसीसी बँकेचे माजी अध्यक्ष करुणा गायकवाड , कमर्शियल डिपार्टमेंटचे कल्पना बनसोडे,
महबूब शेख, रफिक शेख, स्वप्नील शिवशरण, मनोज वाल्मिकी, ए.के यादव यांच्यासह युनियन पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यालयीन अधिक्षक साधना शिंदे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे कार्य हे कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्ती हा शेवट नसून आयुष्याच्या नव्या आनंददायी पर्वाची सुरुवात आहे. संस्थेसाठी दिलेले त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी रेल्वे विभागातील कर्मचारी, अधिकारी तसेच नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Post Views: 19