अकलूज – अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या ३२ गावातून १४० सार्वजनिक गणेश मंडळे असून ५ गावात मात्र एक गाव एक गणपती राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिली.
अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत श्रीपुर आऊट पोस्ट, अकलूज शहर बीट, यशवंतनगर बीट, कोंडबावी बीट व माळीनगर चौकी या ठाण्या अंतर्गत ३२ गावांचा समावेश आहे. या गावातून ३० लहान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे व ११० मोठी सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे. तर ५ गावात एक गाव एक गणपती बसवण्याची यावर्षी योजना आहे. यामध्ये बिजवडी, गणेशगाव, कोंढारपट्टा, माळेवाडी, गिरझणी, बोरगाव या गावांचा समावेश आहे.
गणेशोत्सव मंडळांच्या बंदोबस्ता करीता अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत एक पोलीस निरीक्षक, चार दुय्यम अधिकारी,३५ पोलीस अंमलदार, ५० पुरुष होमगार्ड,१० महिला होमगार्ड व एस आर पी ची २५ जणांची एक तुकडी एवढा बंदोबस्त राहणार असल्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बबलू गाडे यांनी सांगितले.=============== फोटो अकलूज येथील शिवरत्न मंडळाने उभारलेल्या राजवाडा देखावा व गणेशाची मूर्ती
Post Views: 9