पंढरपुर – येथील बहुचर्चित विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब, यांना निवेदन दिल्याची माहिती माजी नगरसेवक तथा पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपुरकर आणि संभाजी ब्रिगडच्या केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी एका पत्रकाव्दारे दिली.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात फत्तेपूरकर आणि घाडगे यांनी म्हटले आहे की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेला भारतीय जनता पार्टीने स्थानिक मंडळींनी विरोध केला आहे. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारणसभेत गोशाळेचा ठराव रद्द करण्याची मागणी येथील भाजपाच्या नगरसेवकांनी केली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन गोशाळे संदर्भात असा ठराव रद्द केल्यास पंढरपूर शहरांमध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिल्याचे निवेदना मध्ये स्पष्ट केले आहे.
दरम्यान निवेदन दिल्यानंतर माध्यमांना माहिती देताना,भारतीय जनता पार्टीचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. गाईला गोमाता म्हणून हिंदूंच्या मतासाठी फक्त गाईचं भांडवल करणे एवढंच या पक्षाला माहिती आहे. प्रत्यक्ष विषय जेव्हा गोशाळेचा आला तेव्हा भाजपच्या लोकांनी गोशाळाला विरोध केला ही वस्तुस्थिती संपूर्ण पंढरपूरला माहित आहे. गोशाळेच्या ठराव नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी न घेतल्यामुळे नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व २८ विषय स्थगित ठेवले. यासंदर्भात मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यात आला. यामध्ये महिला बालकल्याण समितीचे अतिशय संवेदनाशील विषय होते, त्याचप्रमाणे अंध, अपंगांना द्यावयाच्या अनुदानाचे विषयी विषय होते परंतु भारतीय जनता पार्टीने स्थगित ठेवले. त्यावरुन भारतीय जनता पार्टीची जनते प्रति काय निष्ठा आहे याची कल्पना येते. त्यामुळे शासनाने मंदिर समितीला दिलेल्या जागेची सर्व जनतेसमोर प्रत्यक्ष मोजणी होऊन लोकांच्या समोर आराखडा ठेवणे गरजेचे आहे अशी अपेक्षा पंढरपूरकर करीत असल्याचेही फत्तेपूरकर आणि घाडगे यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादीचे नेते सागर पडगळ, शिवसेनेचे नेते रंजीत बागल, माजी अध्यक्ष नागेश गंगेकर, सुहास बाळवणकर, पांडुरंग इरकल, महेश अधटराव, स्वराज फुगारे, रामेश्वर पाटील, बाळासाहेब आसबे, अनिल माने, धीरज डांगे, शकील रत्नपारखी, नागनाथ अधटराव आधी महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 7