सोलापूर : शहरस्तरीय शालेय स्तरावरील घेण्यात आलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत युनिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींनी अनेक पदके जिंकून शाळेचा गौरव वाढवला.
विद्यार्थ्यांची नावे अशी : भक्ती देशमुख – लांब उडी (U-14 : रौप्यपदक), आकांक्षा देवकते – १०० मी. धावणे (U-17 : कांस्यपदक),आरोही देवकते, सांची कांबळे, भक्ती देशमुख, अमृता बागले (रिले संघ U-14 :कांस्यपदक),
*मिताली पांढरे, आकांक्षा देवकते, सोनाक्षी सदाफुले, गायत्री टाकळकी (रिले संघ :U-17: रौप्यपदक ) यांनी यश मिळवले आहे.
संस्थेचे संस्थापक राजशेखर शिवदारे , डी .एस .टी. एस . मंडळाचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे विश्वस्त शेटे , शैक्षणिक सल्लागार अंजली तिवारी, संस्थेच्या सदस्या डॉ. शुभदा उपासे, शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा बाजपाई , समन्वयिका मानसी झळकिकर ,पर्यवेक्षिका गौरा उडचण म आणि मार्गदर्शक क्रीडा शिक्षक अमर पाटील, ॲथलेटिक्स शिक्षक प्रीती कारले यांनी सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे मनापासून कौतुक करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.