जेऊर – “महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026” अंतर्गत कुंभारगाव (ता.करमाळा) येथे एकाच दिवसात 130 महिलांचे अर्ज दाखल केले आहेत.
कुंभार गावातील कुटुंब महिला शेतकरी गट ,कृषी विभाग, आत्मा व उमेद च्या सहकार्याने महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 अंतर्गत कॅम्प आयोजित करून महिलांचे शेतकरी सर्टिफिकेट साठी अर्ज करण्यात आले यावेळी करमाळा तालुका कृषी व आत्मा विभागातील अधिकारी त्याचबरोबर ,उमेद ची कृषी सखी, व कुटुंब महिला शेतकरी गट यांनी एकत्र येऊन गावातील आठवडी बाजारचा दिवस निवडून गावातील महिलांना योजनेबद्दल माहिती दिली व त्यांचे अर्ज भरून घेतले. दोन तासात 130 महिलांचे ऑनलाईन अर्ज करण्यात आले . व महाराष्ट्र महिला शेतकरी विधेयक 2026 योजना राबवण्यात तालुक्यात आघाडी घेतली
सध्या महाराष्ट्रभर कृषी विभाग,पाणी फाउंडेशन व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप 2026 ही स्पर्धा सुरू असून या स्पर्धेमध्ये अनेक शेतकरी गटाने सहभाग घेतलेला आहे व शेतकरी गट स्थापन करून शेतीमध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीने उत्पादन खर्चात बचत व उत्पन्न वाढविणे , एस ओ पी पालन करणे यातून eleno सारख्या संकटावरील मात करत उत्तम प्रकारची पिके आणले आहेत. याबरोबर हे शेतकरी गट गावागावात सामाजिक कामातही पुढाकार घेत आहेत.
Post Views: 5