धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत सफाईगार, शिपाई व माळी कर्मचाऱ्यांना किमान २५ हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय श्रमिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे आले.
संबंधित कर्मचारी सन २०१३ पासून स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून सेवा बजावत असून, सध्या मिळणारे सुमारे १२ हजार २०० रुपयांचे वेतन महागाईच्या तुलनेत अपुरे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोरोना काळातील कर्मचाऱ्यांच्या सेवेची दखल घेऊन त्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणीही करण्यात आली.
या निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष आनंद भालेराव, उपाध्यक्ष नंदकुमार मानाळे, पुष्पकांत माळाळे, हनुमंत तौर यांच्यासह अर्चना कांबळे,जयश्री आचार्य,स्नेहलता बनसोडे,शिल्पा गोरे,मीरा भालेराव,सुवर्णा एडके,अमर बनसोडे,भीमा सुरवसे,अक्षय शिंगाडे,केदार झेंडे,पल्लवी गायकवाड,आरती,चव्हाण,ल ता झेंडे,सविता बनसोडे,भाग्यश्री शिरसागर,अनुसया गोरे,सुषमा बनसोडे,सारिका जानराव,जया बनसोडे,भाग्यश्री वाठोरे,शुभांगी कांबळे,अरुणा बनसोडे,अर्चना हुंडे,शालिनी शिंगाडे,जया शिंगाडे,मीनाक्षी बनसोडे,संजयोती बनसोडे,छाया कांबळे,स्नेहलता कांबळे,राज्यश्री पेठे,अमोल साबळे,क्षमा बनसोडे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.