श्रीपूर – नीट परिक्षेचा पेपर फुटल्या प्रकरणी कॉक्रोच पार्टी ने दिल्ली येथिल जंतर मंतरवर आंदोलनात वांगचुंग यांनी आमरण उपोषण करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी लावून धरली दरम्यान त्यांची प्रकृती ढासळल्याने हायकोर्टाने सरकारला आदेश देत त्यांना अटक करून रुग्णायलात उपचारा साठी दाखल करणेचा आदेश दिला . त्याप्रमाणे वांगचुंग यांना रुग्णालयात हलवले गेले . त्यानंतर कॉक्रोच पाटीचे आंदोलन चिघळले यात पोलिसांनी बळाचा वापर करत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली यात एका विद्यार्थी विद्यार्थिंनिचा प्राण गेला या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ . प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती . त्या पार्धभूमिवर श्रीपूर येथिल वंचित आघाडीने बंदचे आवाहन केले होते . यास आरपीआय ने ही पाठींबा दिला होता त्यांचे आवाहनास प्रतिसाद देत व्यापारी वर्गाने सर्व दुकाने बंद ठेवत प्रतिसाद दिला . यावेळी श्रीपूर मधील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला . त्यानंतर डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये आरपीआय चे जेष्ठ नेते शामराव भोसले,प्रा . नरेंद्र भोसले, भारत आठवले, किशोर आठवले, सचिन धाईंजे, सागर आठवले यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या केंद्र सरकार व आंदोलन विरोधी भूमिका घेणारे आ . सदाभाऊ खोत यांचा निषेध करत जातीयवादी सरकारला मुठ माती देण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त केली .
Post Views: 10