माळशिरस – भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालय व विजयसिंह मोहिते पाटील ज्युनिअर कॉलेज, जाधववाडी यांस सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी संस्था, बाळे यांच्या वतीने स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी शिक्षक आमदार मा. श्री. दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान शाळेतील स्वच्छता, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण, पर्यावरणपूरक उपक्रम आणि संस्कारमूल्यांच्या जपणुकीची पावती मानला जात आहे. या यशामागे संस्था अध्यक्ष शिवाजी जाधव , मुख्याध्यापक. नानासो घार्गे यांचे नेतृत्व, लिपिक नवनाथ वाघमोडे यांचे नियोजन, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे मोलाचे योगदान आहे.
पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी सर्वांचे अभिनंदन केले. परिसरातून शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 37