करकंब – जळोली ता. पंढरपूर येथील ग्रामसभेत दि.२७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामसेवक नितीन तुळशीदास फासे यांच्या निलंबनाची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कामकाजासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी ग्रामसेवक नितीन तुळशीदास फासे यांच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.ग्राम सभेदरम्यान ग्रामस्थांनी ग्रामसेवकाच्या कामकाजासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले.संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली.ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी करणारा ठराव ग्रामसभेसमोर मांडण्यात आला.चर्चेनंतर सदर ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.मंजूर ठरावाची प्रत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून ग्रामसेवकाच्या निलंबनाबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.दरम्यान ग्रामसभेत मंजूर झालेल्या या ठरावामुळे संबंधित प्रशासनाकडून आता कोणती कार्यवाही केली जाते याकडे जळोली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 55