Sunday, October 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री क्षेत्र पंढरपूर येथे १२ ऑक्टोबरपासून रुक्मिणी नवरात्री संगीत महोत्सवाला प्रारंभ

तरुण भारतbyतरुण भारत
October 11, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर –  श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रुक्मिणी नवरात्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवार, दि. १२ ऑक्टोबरपासून या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. दि. १२ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत श्री संत तुकाराम भवन येथे दोन सत्रांत विविध सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. सायंकाळी ५.३० ते ७ आणि रात्री ७.३० ते १० या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात नामवंत शास्त्रीय गायक, अभंगगायक, युवा कलाकार तसेच नृत्यकलाकार आपली कला विठुरायाच्या चरणी समर्पित करणार आहेत. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सन्माननीय सदस्य, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव आणि व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कृष्णा लवेकर यांचे शास्त्रीय गायन व अभंग आणि ज्योती शाम गोराने यांची अभंगवाणी सादर होणार आहे. मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी देवश्री दंडवते यांचे गायन आणि ‘आयडिया सारेगमप’ विजेती ज्ञानेश्वरी गाडगे यांचा ‘स्वर ज्ञानेश्वरी’ हा कार्यक्रम होईल. बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी प्रा. मधुकर पाटील यांचे ‘संत साहित्याची परंपरा आणि वारकरी संप्रदाय’ या विषयावर व्याख्यान, तसेच पं. कुमार गंधर्व यांचे नातू व शिष्य पं. भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन आणि सगुण-निर्गुण अभंग सादर होतील. गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी रोहित पुजारी यांचे गायन आणि चैतन्य देवढे (माऊली, आळंदी) यांचा ‘स्वर चैतन्य’ कार्यक्रम होईल. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी चैतन्य देशपांडे यांची अभंगवाणी आणि पं. शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय गायन व अभंगांचा ‘स्वराभिषेक’ अनुभवता येईल.
शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी पं. राम विधाते व पं. बजरंग विधाते यांची अभंगवाणी, तर पं. शंकर विधाते यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता ‘नवरस नृत्यांजली’ या भरतनाट्यम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ७.३० वाजता लक्ष्मी बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शक्ती जागर’ या भरतनाट्यम सादरीकरणाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने शास्त्रीय संगीत, अभंगवाणी आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा संगीत महोत्सव सातत्याने आयोजित केला जातो. या उपक्रमामुळे नामवंत कलाकारांसोबतच विविध कलाप्रकारांना व्यासपीठ उपलब्ध होत असून, पंढरपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडत आहे. या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा पंढरपूर व पंचक्रोशीतील कलारसिक आणि संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 5
Previous Post

स्वेरीत एकदिवसीय बांबू हस्तकला कार्यशाळा संपन्न

Next Post

प्रशांत टेकाळे यांच्या अपघाती निधनाने शिवसेना परिवारावर शोककळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
प्रशांत टेकाळे यांच्या अपघाती निधनाने शिवसेना परिवारावर शोककळा

प्रशांत टेकाळे यांच्या अपघाती निधनाने शिवसेना परिवारावर शोककळा

ताज्या बातम्या

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

October 11, 2026

पोलिसांची बदनामी भोवली! आंदोलक महिलेसह दोन वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल

October 11, 2026

झेडपीत पदाधिकारी नॉट रिचेबल ६६ हजारांचा खर्च पाण्यात?

October 11, 2026

ज्योत आणण्याच्या नावाखाली हुल्लडबाजी; पोलिसांचा दणका

October 11, 2026
सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

October 11, 2026
घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

October 11, 2026

हैद्रा दर्ग्यास कुठलाही निधी दिला नाही > जनमेजयराजे भोसले

October 11, 2026

ऐन दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात पाणी नसल्यामुळे ऊस कसा वाचायचा, चांगल्या दराचीही अपेक्षा

October 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1340592

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!