सोलापूर : जिल्हा न्यायालय, सोलापूरच्या प्रबंधक पदावर संजय म्याकलवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज एस. शर्मा यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई येथून कनिष्ठ लिपिक पदावरून न्यायालयीन सेवेला प्रारंभ केलेल्या संजय म्याकलवार यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि प्रशासकीय कौशल्याच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. न्यायालयीन सेवेत विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी पारदर्शक कार्यपद्धती, शिस्तबद्ध कामकाज आणि सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले.
शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते न्यायालयीन कर्मचारी व अधिकारी वर्गात ‘अजातशत्रू’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे न्यायालयीन कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संजय म्याकलवार यांच्या या यशाबद्दल जिल्हा न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी, वकीलवर्ग तसेच विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
Post Views: 13