बार्शी – येथील सुलाखे हायस्कूल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. अनंत कवठाळे सर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ .राजश्री पाटील, सचिव म्हणून मुख्याध्यापक श्री. इंगळे रामकृष्ण सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार उमेश पवार, स्थानिक प्राधिकरण सदस्य व बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती श्री.भारत पवार,शिक्षक सदस्य प्रमोद माळी सर ,जेष्ठ शिक्षण तज्ञ मंगोलीकर सर, मुख्य लिपीक उमेश ठोंबरे सर व इतर सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती २०२६ ते २०२८ गठीत करण्यात आली. बार्शी एज्युकेशन सोसायटीचे सचिव कवठाळे सर यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन करुन शाळा व्यवस्थापन समितीच्या ्च्या्च्य कार्याबद्दल माहिती दिली. मनगोलिकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार व स्वागत मुख्याध्यापक श्री. इंगळे सर यांनी केले. त्यांनी हायस्कूलच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सर्व सदस्यांसमोर सादर केला. माळी सर यांनी सर्वांचे आभार मानले.
Post Views: 10