बार्शी – परांडा रोडलगत असलेल्या जे. आर. इलेक्ट्रिकल्स यांच्या पश्चिम बाजूने उत्तर दिशेस जाणाऱ्या यमाई रस्त्याबाबत उद्भवलेल्या वादाच्या अनुषंगाने आज महसूल विभागामार्फत स्थळ पाहणी करण्यात आली.
यावेळी अर्जदार रियाज आजम शेख व इतर तसेच गैरअर्जदार सौदागर गोवर्धन गोरे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन्ही पक्षांनी सकारात्मक भूमिका घेत सामंजस्याने तोडगा काढण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार यापूर्वी अडविण्यात आलेला यमाई रस्ता परस्पर समजुतीने खुला करण्यात आला.
महसूल विभागाच्या मध्यस्थीमुळे संबंधित वाद शांततापूर्ण मार्गाने निकाली निघाला असून, दोन्ही पक्षांनी भविष्यातही कायद्याचे पालन करुन सलोखा कायम ठेवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मंडळ अधिकारी शरद शिंदे, ग्राम महसूल अधिकारी दिनेश महाजन, पोलीस पाटील संतोष सातपुते, महसूल सेवक विकास शिंदे तसेच संबंधित पक्षकार व इतर नागरिक उपस्थित होते.
Post Views: 11