मुदखेड – बारड येथील शितलादेवी मंदिर परिसरात भक्तांच्या सुरक्षतेसाठी सी सी टीव्ही कॅमेरे लोकसभागातून बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता गैरप्रकाराला आळा बसणार असून चोरीच्या घटनेवर नजर ठेवण्यास पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय मंठाळे, पंचायत समिती माजी उपसभापती सुनील देशमुख बारडकर यांच्या संकल्पनेतून रबविण्यात येणारा उपक्रम भक्तांच्या सुरक्षितेसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.
तालुक्यातील बारड या ठिकाणी गावापासून एक किलोमीटर अंतरावर शीतला देवीचे जाज्वल प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे . या ठिकाणी बाहेर राजासह मराठवाडा, विदर्भ तसेच जिल्ह्यातील देवीचे भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. परंतु गर्दीमुळे चोर्या , छेडछाड, गुंडागर्दी अशा घटना सातत्याने घडत असतात. सुरक्षेतेच्या दृष्टीने गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलणे गरजेचे होते. या उद्देशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय मंठाळे, पंचायत समिती माजी उपसभा
















